शिक्षकाच्या वेशात नराधम; अल्पवयीन मुलीवर अत्याचार

file photo
file photo

निरा : पुढारी वृत्तसेवा : निरा (ता. पुरंदर) येथील एका कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीला नापास करण्याची भीती दाखवून तिचा विनयभंग करीत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका शिक्षकास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. सुनील विश्वनाथ चव्हाण (वय 28, मूळ रा. खोजेवाडी, आपसिंगी, ता. जि. सातारा, सध्या रा. निरा) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चव्हाण हा निरा (ता. पुरंदर) येथे एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करीत आहे. तेथे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात होती.

शिक्षकाने 1 मे 2023 रोजी दुपारी एक वाजेनंतर तसेच पुन्हा आठ दिवसांनी कोचिंग क्लासच्या आतील रूममध्ये पीडितेला नापास करण्याची भीती दाखवून तिचा विनयभंग करीत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबतची फिर्याद दाखल होताच जेजुरी पोलिसांनी या शिक्षकावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news