

पुणे : पुढारी वृत्तसेवा : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या जोडण्याच्या कामामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात 8 ते 22 जानेवारी या काळात एकवेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. पर्वती (एमएलआर) टाकी ते जगताप हाऊसदरम्यान नव्याने टाकलेल्या 1473 मिमी व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. या लाईनच्या जोडणीची कामे सोमवार (दि. 8 जानेवारी) पासून सुरू होणार आहेत. यामुळे 800 मिमी व्यासाच्या पर्यायी लाईनमधून पुढील भागाला एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
प्र. क्र. 18 : स्वारगेट पोलिस लाईन, झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमीनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंज पेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलिस वसाहत.
प्र. क्र. 19 : लोहियानगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरू नानकनगर, नेहरू रस्ता, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग.
प्र. क्र. 20 : भगवान दास चाळ, वायमेकर चाळ, न्यू नाना पेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ, भवानी पेठ पोलिस वसाहत, सोमवार पेठ पोलिस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महिफिल बाढा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी इत्यादी भाग.
प्र. क्र. 28 : मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रस्ता एस. टी. स्टँड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी.
प्र. क्र. 29 : लक्ष्मीनारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्रमंडळ कॉलनी इत्यादी भाग.
हेही वाचा