‘त्या’ विकसकावर गुन्हा दाखल करा : पालिकेचे पोलिसांना पत्र | पुढारी

‘त्या’ विकसकावर गुन्हा दाखल करा : पालिकेचे पोलिसांना पत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंबेगावमधील 11 बेकायदा इमारतींच्या बांधकामप्रकरणी येथील दहा विकसक संस्था, मालक व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने भारती विद्यापीठ पोलिसांना दिले आहे.
आंबेगावमधील स. नं. 10 मधील अथर्व डेव्हलपर्स व इतर, साई गणेश डेव्हलपर्स व इतर, श्रावणी डेव्हलपर्स व इतर, आर. एल. चोरगे व इतर, श्री डेव्हलपर्स व इतर, साईनाथ डेव्हलपर्स व इतर, समर्थ डेव्हलपर्स व इतर, गवळी व इतर, मौर्य डेव्हलपर्स व इतर, गुरुदत्त डेव्हलपर्स, गुरुदत्त डेव्हलपर्स, आदींच्या 11 बेकायदा इमारतींचे बांधकाम महापालिकेने 28 डिसेंबर रोजी पाडून टाकले.

या कारवाईत सुमारे 44 हजार चौ. फूट बांधकाम पाडण्यात आले आहे. दरम्यान, या विकसक बिल्डरांना 20 डिसेंबरला चोवीस तासांत अनधिकृत बांधकाम थांबविण्याबाबत तसेच स्वत:हून बांधकाम काढून घेण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. संबंधितांविरोधात एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, असे पत्र महापालिकेच्या बांधकाम विकास झोन क्र. 2 चे कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना दिले आहे.

हेही वाचा

Back to top button