Latest
आरक्षण बचावसाठी ओबीसींचा आज पंढरपुरात एल्गार मेळावा
सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसी आरक्षण बचावासाठी शनिवारी पंढरपुरात ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे. त्यासाठी अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. प्रकाश शेंडगे यांच्यासह दिग्गज ओबीसी नेते शनिवारी (दि. 6) पंढरपूर दौर्यावर येत आहेत.
पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानावर दुपारी तीन वाजता हा मेळावा होत आहे. या मेळाव्यास अनिन व नागरी पुरवठामंत्री भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याकडे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणाबाबत सर्वांना उत्सुकता आहे. आ. पडळकर हे या मेळाव्यात कोणाला लक्ष करणार, याकडे ही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, यासाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांत हे एल्गार मेळावे सुरू आहेत.

