अयोध्या काय जगातील कोणत्याही मंदिरात जाईन ; आमंत्रण तरी येऊ दे : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

अयोध्या काय जगातील कोणत्याही मंदिरात जाईन ; आमंत्रण तरी येऊ दे : खासदार सुप्रिया सुळे

पुढारी वृत्तसेवा : किल्ले शिवनेरीपासून सुरू झालेला खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची सांगता आज पुण्यात झाली. हा मोर्चा पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. यावेळी खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कांदा आणि आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने न्याय देण्याची मागणी केली.

त्या पुढे म्हणतात, ‘ महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने पाणी कपातीचे संकट डोक्यावर उभे राहिले आहे. अशावेळी सरकारने घर फोडणे, पक्ष फोडणे हे काम बंद करून अडचणी दूर कराव्यात. खरं तर सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जाणे महत्त्वाचं आहे. पण असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकार काही भूमिका घेताना दिसत नाही.’ पुढे राममंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘अयोध्येतील राममंदिरच काय मी जगातील कुठल्याही मंदिरात जाईन. त्यासाठी आधी आमंत्रण तर येऊ दे.’

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबतही त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. वाढती गुन्हेगारी हे गृहमंत्र्यांच अपयश असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. नागपूरच काय महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्याचं स्वत: दादांनीही मान्य केल्याचं यावेळी त्या म्हणाल्या. या सांगता सभेनंतर जिल्हा प्रशासनला निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button