Vande Bharat Train : मराठवाड्यात पहिली वंदे भारत ट्रेन धावली; देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा | पुढारी

Vande Bharat Train : मराठवाड्यात पहिली वंदे भारत ट्रेन धावली; देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आज अत्याधुनिक प्रकारची ट्रेन मराठवाड्याला मिळाली आहे. याचा खूप आनंद आहे. रेल्वेच्या बजेटमध्ये आता वाढ झाली असून १३ हजार कोटी रुपये आपल्याला रेल्वेसाठी मिळाले आहे. रेल्वेचा विस्तार आता होत असून युरोप, अमेरिकेप्रमाणे रेल्वे धावेल, याचा आनंद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते मुंबई अशी मराठवाड्यातल्या पहिल्या वंदे भारत ट्रेन च्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला. Vande Bharat Train

ज्या वंदे भारत ट्रेनची सर्वांना उत्सुकता लागलेली ती आज मोठ्या उत्साहात जलना ते मुंबई अशी धावली. मोठ्या उत्साहात मराठवाड्यातली पहिली जालना ते मुंबई अशा वंदे भारत ट्रेनचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत ट्रेनचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जालना स्टेशन येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून थाटात उद्घाटन करण्यात आले. Vande Bharat Train

तसेच छत्रपती संभाजीनगर येथे देखील मोठ्या उत्साहात वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यात आले. वंदे भारत ट्रेनच्या उदघाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अर्जुन खोतकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. नारायण कुचे, बबनराव लोणीकर, संतोष दानवे , नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार सह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतीय पध्दतीने बनावट ही पूर्णतः ट्रेन आहे. अडीचशेच्या स्पीडने ट्रेन धावनाऱ्या अत्याधुनिक ट्रेन मिळाली आहे.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, जालना ते मुंबई अशी वंदे भारत ट्रेन सुरू झाली. रेल्वे साठी अगोदर २०१४ ते २०२३ पर्यत महाराष्ट्रात रेल्वे साठी सोळाशे कोटींचे बजेट मिळत होते. ते आता यावर्षी १२ हजार कोटी दिलेले आहे. तसेच २००६ ते २०१४ पर्यत प्रति दिन ४ किलोमीटर रस्त्याचे काम होत होते. तर त्यानंतर ७ किलोमीटर व्हायला लागले. आता २०२३ ला १२ किलोमीटर होत असून २०२४ मध्ये १६ किलोमीटर रस्त्याचे काम प्रति दिन होईल.

Vande Bharat Train  रात्रीतून बदलली पत्रिका; खा. जलील यांचे टाकले पत्रिकेत नाव

खा. इम्तियाज जलील यांचे नाव पत्रिकेत कालपर्यत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करून तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच शुक्रवारी (दि.२९) त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक गाठून आंदोलन केले होते. त्याचा परिणाम रात्रीतून पत्रिका बदलण्यात आली असून खा. इम्तियाज जलील यांचे नाव पत्रिकेत टाकले गेले. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दोन्ही पत्रिका व्हायरल केला.

मोदी… मोदी… अशा घोषणांनी दणाणले छत्रपती संभाजीनगर स्टेशन

आज एकूण ६ वंदे भारत ट्रेन तर २ अमृत भारत ट्रेनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी जालना ते मुंबई ट्रेनचे उद्घाटन झाले. जालनाहून ट्रेन निघताच छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोदी… मोदी … अशा जोरदार घोषणाबाजी करत रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडले. यावेळी शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, माजी नगरसेवक शिवाजी दांडगेसह आदींची उपस्थिती होती.

खा. जलील नाराज होऊन पोलिसांचा निषेध

भाजपाच्या कार्यतर्फे मोदी मोदी यांचा नारा लावत असताना त्यांना काहिही म्हणाले नाही. पोलिसांनी आमच्याच कार्यकर्त्यांना का उचलले. अशी कारवाई होत असेल तर आम्ही आवाज उठवू. आम्ही दिल्ली पर्यत आवाज उठवू असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांचा निषेध व्यक्त केला

वंदे भारत ट्रेनला झाला उशीर

वंदे भारत ट्रेन सकाळी ११.५५ ला छत्रपती संभाजीनगर येथे येऊन ११.५७ ला रवाना होणार होती. सर्वजण सकाळी १० वाजेपासून रेल्वे स्थानक येथे स्वागतासाठी हजर होते. मात्र, दुपारी १ वाजेपर्यंत ट्रेन आली.

हेही वाचा 

 

Back to top button