सुनील केदार यांना दिलासा नाही; जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

सुनील केदार यांना दिलासा नाही; जामीन अर्ज फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर जिल्हा बँक घोटळा प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेले काँग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यांच्या शिक्षेला स्थगित देण्यास न्यायालयाने आज (दि.३०) नकार दिल्याने त्यांना दिलासा मिळू शकला नाही.  केदार यांच्यासह सर्व सहा आरोपीना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन आणि शिक्षेला स्थगिती नाकारली आहे. यामुळे त्यांचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढण्याची चिन्हे आहेत. Sunil Kedar

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 152 कोटींच्या रोखे घोटाळा प्रकरणी जेएमएफसी न्यायालयाने त्यांना 5 वर्षे कारावास आणि 1 प्रत्येकी 12.5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. काही दिवस प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मेडिकल शासकीय रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 52 या अतिदक्षता विभागात 22 ते 28 डिसेंबर दरम्यान दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, त्यांच्या जामीन व शिक्षेच्या स्थगितीवर युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र निर्णय 30 डिसेंबर पर्यंत लांबणीवर गेला होता. तत्पूर्वी केदार यांची प्रकृती ठीक असल्याने मेडिकलमधून सुटी झाली व त्यांची थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. आज अखेर सत्र न्यायालयाने शिक्षेला स्थगिती व जामीन नाकारल्याने केदार आणि सहकाऱ्यांना मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत कारागृहातच करावे लागणार आहे.

या निर्णयामुळे केदार समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा असल्यामुळे 153 कोटींचा या घोटाळ्यात आरोपी विरोधात  कागदोपत्री पुरावे असल्याने शिक्षेला स्थगिती किंवा जामीन दिल्यास समाजात चांगला संदेश जाणार नाही, असे निरीक्षण जामीन नाकारताना न्यायालयाने नोंदवली असल्याची माहिती सहायक सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

हेही वाचा 

Back to top button