‘व्यसन टाळा, स्वच्छतेचे नियम पाळा’ : डॉ. रमण गंगाखेडकर यांचा संदेश

‘व्यसन टाळा, स्वच्छतेचे नियम पाळा’ : डॉ. रमण गंगाखेडकर यांचा संदेश
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात डॉ. रमण गंगाखेडकर यांनी 'आरोग्य आणि स्वछता' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले रहावे म्हणून व्यसनांपासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे, असा संदेश शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी या वेळी दिला. गंगाखेडकर यांनी मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व सांगताना दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेच्या सवयी कशा विकसित करता येतील, ते उदाहरणांसह सांगितले.

ते म्हणाले, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणे, दररोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपण्यापूर्वी दात घासणे, कोणत्याही उघड्या पृष्ठभागावर स्पर्श करणे टाळणे या सवयी आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. चालणे हा सर्वात उत्तम व्यायाम असून दररोज चालण्याची सवय ठेवावी. किशोरवयातील काही चुकीच्या सवयीमुळे त्याचा प्रौढ जीवनावर परिणाम होतो. व्यसनाची लागलेली सवय मोडणे कठीण जाते. याबाबत मित्रांना वेळीच नाही म्हणायला शिकले पाहिजे, असे डॉ. गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले, मुलांची स्वतःची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे. प्रत्यकाने स्वतःमधील क्षमता ओळखून त्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे महत्त्वाचे आहे. स्वतःची कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवनात लहान-लहान गोष्टीमधील स्वच्छता, समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, हेच आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी विद्या प्राधिकरणाचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे, विज्ञान विभागाच्या विभाग प्रमुख तेजस्विनी आळवेकर, अधिव्याख्याता वृषाली गायकवाड उपस्थित होते.

मानवी रक्तामध्ये प्लास्टिकचा अंश

प्लास्टिकचा अतिवापर मानवाच्या शरीरावर खूप परिणाम करत आहे. प्लास्टिकचा अंश आता मानवी रक्तामध्ये सापडत आहे, ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले. या वेळी डॉ. गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news