स्वतःचे ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ घेऊन फिरतो ‘हा’ प्राणी | पुढारी

स्वतःचे ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ घेऊन फिरतो ‘हा’ प्राणी

नवी दिल्ली : निसर्गाने प्रत्येक जीवाला स्वसंरक्षण आणि उदरभरण यासाठी काही ना काही देणग्या दिलेल्या आहेत. या पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची रचना वेगळी असते. असाच एक जीव आहे ज्याची रचना एखाद्या ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ प्रमाणे आहे. ‘आर्माडिलो’ असे या प्राण्याचे नाव आहे.

या प्राण्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या तरी त्याला काहीच होत नाही. आर्माडिलोच्या एका अंड्यातून चार जीव जन्माला येतात. हे प्राणी दिवसभर आराम करतात आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडतात. आर्माडिलो या प्राण्याच्या 20 प्रजाती अस्तित्वात आहेत. लॅटिन अमेरिकेत हा प्राणी आढळतो. खवल्या मांजर सारखं शरीर असणारा प्राणी आहे. याचे तोंड हे सुसरीसारखं लांबट असतं. त्याच्या पाठीवर असलेले कवच इतकं मजबूत असतं की अगदी बंदुकीची गोळी झाडली तरी काहीच परिणाम होत नाही. त्याच्या पाठीवर कासवांसारखं टणक कवच असतं. या प्राण्याचे वैज्ञानिक नाव डेसीपोडिडे असे आहे. अशा चिलखती कवचामुळे त्याचे अनेक शिकारी प्राण्यांपासून रक्षण होते. या चिलखती कवचामुळेच त्याला ‘आर्माडिलो’ असे नाव पडले आहे.

Back to top button