एचआयव्हीग्रस्तांमधील क्षयराेग प्रतिबंधासाठी ससूनमध्ये अभ्यास

एचआयव्हीग्रस्तांमधील क्षयराेग प्रतिबंधासाठी ससूनमध्ये अभ्यास
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी काही दशकांपासून आयसोनिएझेड प्रिव्हेनटीव्ह थेरपी (आयपीटी) वापरली जाते. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींसाठी टीबी प्रिव्हेंटिव्ह थेरपी (टीपीटी) सुचवली आहे. एचआयव्हीग्रस्त व्यक्तींना क्षयरोग होऊ नये, यासाठी 'वन टू थ्री एचपी' या प्रतिबंधात्मक उपचारपध्दतीचा अभ्यास ससून रुग्णालयातर्फे हाती घेण्यात आला आहे. यामध्ये उपचारांचा कालावधी सहा महिन्यांऐवजी एका महिन्यापर्यंत कमी करता येईल का, हे तपासण्यात येत आहे.

कमी आणि अति-कमी कालावधीच्या क्षयरोग रुग्णांमध्ये प्रतिबंधात्मक थेरपीचा स्वीकार तपासून पाहण्यासाठी 'वन टू थ—ी एचपी' हा अभ्यास हाती घेण्यात आला आहे. पुण्यातील एचआयव्हीग्रस्त व्यक्तींना या अभ्यासात रिफार्पेटीन आणि आयसोनिएझेड दररोज एक महिन्यासाठी आणि तुलनेत आठवड्यातून एकदा असे 3 महिन्यांसाठी दिले जाईल, अशी माहिती ससूनच्या वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. रोहिदास बोरसे यांनी दिली. अभ्यासामध्ये एचआयव्हीग्रस्त 13 वर्षांवरील मुले आणि प्रौढ व्यक्ती अशा 250 जणांचा समावेश करून घेतला जाईल. अपेक्षित परिणाम, उपचार पूर्ण करणे आणि औषधांचे पालन करणे आदी निकषांचा अभ्यासात समावेश केला जाणार आहे. या अभ्यासाच्या निष्कर्षामुळे, राष्ट्रीय टीबी कार्यक्रमाला फायदा होऊ शकणार आहे. डॉ. रोहिदास बोरसे, डॉ. विद्या मावे, डॉ. निशी सूर्यवंशी आणि डॉ. नीतल नेवरेकर हे अभ्यास सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

का देतात 'आयपीटी'?

एचआयव्हीबाधित रुग्णांच्या शरीरात सुप्त स्वरूपात टीबीचे जीवाणू असल्यास 'आयपीटी'च्या औषधांमुळे ते नाहीसे होण्यास मदत होते. भविष्यातही त्यांना टीबी होण्याचा धोका नगण्य होतो. याआधी बीजेमध्ये 200 एचआयव्हीबाधितांना आठवड्यातून एक वेळ असे तीन महिने 'आयपीटी' देत अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्यांचे वर्षभर निरीक्षण करण्यात आले असता एकाही रुग्णाला टीबीची लागण झाली नाही. या अभ्यासाच्या शंभर टक्के यशस्वितेनंतर आता हा औषधोपचार महिन्यावर आणण्यासाठी नवीन अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीसोबत संयुक्तपणे ससूनतर्फे टीबी आणि एचआयव्ही बाधित लोकांबाबत काही दशके क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. 'वन टू थ्री एचपी' ट्रायलमध्ये निर्णायक भूमिका पार पाडण्यास मदत होणार आहे.

– डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news