पुनर्वसन जमीन घोटाळा : दलालाकडून अनेकांची फसवणूक

file photo
file photo
Published on
Updated on

यवत : पुढारी वृत्तसेवा :  पुनर्वसन जमिनींचे घोटाळे करणार्‍या पासलकर या दलालाने दौंड शहर आणि परिसरात अनेकांना जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे अनेक किस्से सध्या दौंडमध्ये चर्चिले जात आहेत. मोठ्या राजकारण्याच्या वरदहस्ताने पासलकरने येथे जमिनींचे अनेक घोटाळे केले आहेत. दौंडच्या बड्या नेत्याच्या पाठबळामुळे पासलकर विरुद्ध तक्रार करायला कोणी ही पुढे येत नाही. पासलकरने दौंड शहर आणि लगतच्या वाडीवस्त्यांवर अनेक पुनर्वसन व वतनाच्या कायदेशीर वादात अडकलेल्या मालमत्ता घेऊन त्या फसवणूक करून दुसर्‍याला विकल्या आहेत, त्यांच्याकडून 'टोकन मनी' पायी लाखो रुपये घेतले आहेत. या लोकांना आता कोर्टाची फरफट सोसावी लागत आहे. असे बरेच प्रकार पासलकर याने दौंड शहरात केलेले आहेत. या पासलकरच्या मालमत्ता विरुद्ध पुणे, बारामती, दौंड, मुंबई या ठिकाणी अनेक दिवाणी खटले दाखल आहेत.

संबंधित बातम्या :

ज्या व्यक्तींना पासलकर आणि त्याच्या टोळीने मालमत्ता विकली आहे, त्या व्यक्तींना आजपर्यंत ताबा मिळालेला नाही; परंतु त्या व्यक्तीकडून या लोकांनी लाखोंनी व कोटींनी पैसे घेतलेले आहेत. आता ते पैशासाठी हेलपाटे मारून थकले आहेत त्यांना मालमत्ता आणि पैसे दोन्ही गमवावे लागले आहे. या पासलकरच्या प्रत्येक मालमत्तेवर न्यायालयात प्रकरणे सुरू आहेत, तरीही संधी मिळताच हे सर्व खटले लपवून ठेवून खरेदीदाराला विश्वासात घेऊन त्याच्यावर प्रभाव पाडून हा पासलकर मालमत्ता गळ्यात मारतो पैसे घेतो आणि नंतर खरेदीदाराला फक्त कोर्टच्या फेर्‍या माराव्या लागतात.

दौंड शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांनी पासलकरकडून जमिनी घेतल्या आणि आता ते फसले आहेत. या फसलेल्या व्यापारी व बिल्डर लोकांनी दिलेली रक्कम परत मागितली, परंतु पासलकर आणि टोळीच्या पुढे त्यांचे काही एक चालत नाही. ज्या जागेवर त्यांचा ताबाच नाही त्या जागेवर मूळमालकाचा व काही ठरावीक ठिकाणी दुसर्‍या व्यक्तींचा ताबा आहे, तेथे कागदोपत्री घोळ घालून पासलकर फक्त लोकांना अडकवत आहे.

का होत नाही तक्रार?
पासलकर याला दौंड शहरातील एका अतिशय प्रबळ आणि शहरावर पूर्ण हुकुमत असलेल्या राजकारण्याचा पाठिंबा आहे. कोणतेही प्रकरण वाढले की हा राजकारणी समोरच्याला आपल्या पध्दतीने समजावून काही तरी मार्ग काढतो आणि पासलकर नामानिराळा होतो. हा राजकारणी याची मजबूत फी मात्र पासलकरकडून घेतो अशी ही माहिती मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news