पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान ( Gauri Khan ) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नुकतेच तिच्यावर लखनऊ येथील तुलसियानी कंपनीवर गुंतवणूकदार आणि बँकांचे अंदाजे ३० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरी खानची चौकशी करण्यासाठी ईडीने नोटीस पाठविली आहे.
संबंधित बातम्या
रिपोर्टच्या माहितीनुसार, शाहरूखची पत्नी गौरी खान ( Gauri Khan ) लखनऊ येथील रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटीमध्ये तुलसियानी ग्रुपचा एक मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमधून मुंबईचे किरीट जसवंत शहा या व्यक्तीला २०१५ रोजी ८५ लाख रुपयांना एक फ्लॅट खरेदी केला होता. परंतु, कंपनीने जसवंत यांना हा फ्लॅट खरेदी करून दिला नाही. किंवा त्याचे ८५ लाख रूपयेही परत केले नाहीत.
यानंतर किरीट जसवंत शहा याने कंपनीच्या विरोधात म्हणजे, तुलसियानी ग्रुपचे संचालक अनिल कुमार तुलसियानी, महेश तुलसियानी आणि गौरी खान यांच्यावर दिल्लीतील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गौरीला ईडीने नोटीस पाठविली आहे.
दरम्यान गौरी खान या प्रोजेक्टची जाहिरात करत होती म्हणून हा फ्लॅट खरेदी केला असल्याचे किरीट जसवंत शहाने तक्रारीत सांगितले आहे. या चौकशीत गौरी दोषी आहे की नाही?, ब्रँड ॲम्बेसेडर होण्यासाठी किती पैसे घेतले?, किरीट शहाचे ८५ लाख रूपये कोठे गेले? यासारख्या अनेक प्रश्नाची चौकशी करण्यात येणार आहे.