Pune Book Festival : तब्बल 33 पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन! | पुढारी

Pune Book Festival : तब्बल 33 पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुण्यात अनुवाद कार्यशाळा झाली होती. यातून तयार झालेल्या 33 पुस्तकांचे प्रकाशन मंगळवारी मान्यवरांच्या हस्ते पुणे पुस्तक महोत्सवात झाले. प्रकाशन कार्यक्रमाला साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, ज्येष्ठ बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक, आनंद काटीकर उपस्थित होते.

युवराज मलिक म्हणाले, ‘मानव संवाद करू शकतो म्हणून माणूस श्रेष्ठ आहे. संस्कृतीचे वाहक म्हणून वाचकांनी काम करायचे आहे. बालसाहित्य समाजाची संरचना करते. त्यामुळे सकस बालसाहित्याची निर्मिती अत्यावश्यक आहे.’ रवींद्र गुर्जर म्हणाले, ‘अनुवाद ही व्यापक संकल्पना आहे. ललित पुस्तकांचा मराठीमध्ये अनुवाद 70 च्या दशकात सुरू झाला. गेल्या पन्नास वर्षांत अनुवादक म्हणून पॅपिलॉनसह अनेक पुस्तकांचा अनुवाद करता आला. सुरुवातीला अनुवादित साहित्य गौण समजले जायचे, पण आता अनुवादित साहित्याला प्रतिष्ठा मिळाली.’ डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘लहान मुलांसाठी एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पुस्तके प्रकाशित होणे दुर्मीळ आहे. मुलांसाठी सोपे, सुटसुटीत लिहावे लागते, पुस्तके आकर्षक असावी लागतात.’

हेही वाचा

Back to top button