पृथ्वीशिवाय अन्य सतरा ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व | पुढारी

पृथ्वीशिवाय अन्य सतरा ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व

वॉशिंग्टन : जीवसृष्टीसाठी आवश्यक असणार्‍या मूलभूत घटकांमध्ये पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या सौरमालिकेतील किंवा बाहेरील ग्रहांबाबतचे संशोधन करत असताना तिथे पाण्याचे अस्तित्व आहे का, हे पाहिले जात असते. अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने यासंदर्भातील सखोल डेटा गोळा केला आहे. त्यानुसार अंतराळात पृथ्वीशिवाय आणखी 17 ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व असल्याचे आढळले आहे. हा डेटा मानवासाठी इतर ठिकाणी जीवसृष्टी निर्माण करण्याकरिता अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. आपल्या सौरमालिकेत फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे.

आपल्या सौरमालिकेप्रमाणे विविध ग्रह असलेल्या अनेक सौरमालिका अंतराळात आहेत. अशा प्रकारच्या सौरमालिकेतील अनेक ग्रहांवर जीवसृष्टी असू शकते असा संशोधकांचा दावा आहे. पृथ्वीसारखे आणखी सतरा ग्रह आहेत, जिथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते असा दावा ‘नासा’ने केला आहे. या ग्रहावंर पाणी साठा देखील आहे. हे सर्व सतरा ग्रह आपल्या सौरमालिकेबाहेरील आहेत. काही ग्रहांवर बर्फाळ महासागर आहेत. काहींच्या पृष्ठभागावर महासागर आहेत, तर काहींच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली महासागर आहेत असा दावा देखील नासाने आपल्या संशोधनाच्या माध्यमातून केला आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी या 17 ग्रहांवर असलेल्या गिझरचा सखोल अभ्यास केला आहे.

जमिनीवर अशी छिद्रे असतात जिथून कारंज्यासारखे पाणी बाहेर पडते. या छिद्रांना गीझर वैज्ञानिक भाषेत गिझर असे म्हणतात. पाणी गोठल्यामुळे किंवा वितळल्यामुळे बर्फाळ महासागराच्या पृष्ठभागाखाली दाब निर्माण होतो. अशा स्थिती जमिनीतील पाणी कारंजे सारखे बाहेर वाहायला लागते. कधीकधी हे कारंजे शंभर मीटर उंच असतात. विशेष म्हणजे हे 17 ग्रह पृथ्वीच्या जवळपास आहेत. येथे पुरेसा प्रकाश, पाणी आणि बर्फ आहे. दगड देखील आहेत. या खडकांची खरी रचना कशी आहे, यावर देखील संशोधन सुरू आहे.

Back to top button