पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगतो तो आपला अभिमानच आहे. देश जातीवर नाही, तर सदाचार आणि आध्यात्मिकतेवर चालत असून, देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज आदर्शच आहेत,' असे प्रतिपादन सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने सर्व हिंदू संघटनांच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सुधीर मुनगुंटीवार यांना 'हिंदवी स्वराज्यभूषण वीर जीवा महाले' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर आमदार महेश लांडगे, स्वाती मोहोळ, अॅड. निलेश आंद्रे, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार, प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, सुधीर देवधर, भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मिलिंद एकबोटे तर सूत्रसंचालन नंदकिशोर एकबोटे यांनी केले.
लंडनमध्ये महाराजांचा पुतळा उभारणार : सुधीर मुनगंटीवार
छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील. लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल,' असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शिवप्रतापित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनील देवधर आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, 'छत्रपती श्रीशिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्या वतीने त्या जपल्या जातील. छत्रपती श्रीशिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवराज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.'
हेही वाचा