Crime News : वाघेश्वर मंदिरातील प्राचीन घंटा चोरीस | पुढारी

Crime News : वाघेश्वर मंदिरातील प्राचीन घंटा चोरीस

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : पवन मावळातील प्रसिद्ध असलेल्या वाघेश्वर येथील शिवमंदिरातील प्राचीन घंटेची चोरी करण्यात आली. ही घटना मंगळवार (दि. 5) समोर आली आहे. पवन मावळातील वाघेश्वर येथील शिवमंदिरातील 8 किलो वजनाची घंटा अज्ञातांनी लंपास केली. सदरचा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार अज्ञात चोरांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पुजारी लक्ष्मण गुरव यांनी सोमवार (दि. 5 ) रोजी सायंकाळी दिवाबत्ती केली. त्यानंतर ते घरी निघून गेले. दुसर्‍या दिवशी ते मंदिरात पूजेसाठी गेले असता तिथे मंदिरातील घंटा चोरीला गेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब जवळच्या लोकांना सांगितली आणि पोलिस पाटील प्रवीण शिंदे, संतोष कडू, अजीवलीचे सरपंच नितीन लायगुडे यांनी पोलिसांना ताबडतोब ही घटना कळवली आणि अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवली आहे.

  • काही महिन्यांपूर्वीदेखील वाघेश्वर येथील मंदिरातील प्राचीन मुखवटे व अन्य वस्तुंची चोरी झाली होती. त्यातील काही मंदिर परिसरातच सापडल्या; परंतु आता एवढी मोठी प्राचीन घंटा चोरट्यांनी लंपास केल्याने स्थानिक नागरिक संतप्त झालेले आहेत.
  • भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरत असते. अशा ठिकाणी वारंवार चोरी होत असल्याने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सर्व ग्रामस्थांकडून या वेळी केली जात आहे.

हेही वाचा

 

Back to top button