Pimpri News : विकासकामे पाहून ‘सीईओ’ भारावले | पुढारी

Pimpri News : विकासकामे पाहून ‘सीईओ’ भारावले

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा : कान्हे ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेली हायटेक विकासकामे पाहून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांचे विशेष कौतुक केले. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी आज गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षणधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले यांच्यासह कान्हे ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा येथे भेट दिली व गावात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली.

या वेळी सरपंच विजय सातकर, उपसरपंच बाबाजी चोपडे, ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गिरीश सातकर, महेश सातकर, आशा सातकर, रूपाली कुटे, मनीषा ओव्हाळ, सोपान धिंदळे, किशोर सातकर, सोनाली सातकर, संदीप ओव्हाळ, आरिफ मुलाणी, रोहिणी चोपडे, सुजाता चोपडे, पूजा चोपडे उपस्थित होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी ग्रामसचिवालय इमारतीचा दुसर्‍या मजल्यावर सुरू असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम व त्यामधील अद्ययावत केलेले फर्निचर कामाची पाहणी केली.

त्याचप्रमाणे नागरी सुविधा योजनेचे स्टॅम्प काँक्रीट, जलजीवन मिशन योजनेअंर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली व ठेकेदार अधिकारी यांना योग्य सूचना दिल्या. याशिवाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देऊन शाळेत सुरू करण्यात आलेल्या फ्युचरस्टीक क्लासरूम या पुणे जिल्ह्यातील पहिल्या प्रकल्पाची पाहणी केली. या क्लास रूममुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी होणार्‍या फायद्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शनही केले. संबंधित विकासकामे दर्जेदार पध्दतीने सुरू असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. सरपंच विजय सातकर, ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे यांचे विशेष अभिनंदन करत कामाच्या पद्धतीचे विशेष कौतुक केले. सरपंच सातकर यांनी या वेळी त्यांच्या कार्यकाळातील कामांची माहिती दिली.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात मूलभूत विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्यात आली असून जलजिवन मिशन. योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे पाण्याच्या प्रश्न कायमचा मिटणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळेच्या अत्याधुनिक प्रकल्पामुळे कान्हे गावचे नाव देशपातळीवर चमकले हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

विजय सातकर, सरपंच, कान्हे.

हेही वाचा

Back to top button