Pune News : दोन महिला राष्ट्रपती भेटतात तेव्हा… | पुढारी

Pune News : दोन महिला राष्ट्रपती भेटतात तेव्हा...

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी मुर्मू यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती व शाल देऊन गौरविले.

याप्रसंगी अ‍ॅड. प्रताप परदेशी व डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या ‘बाल रक्षण कायद्याचे अंतरंग’ या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना प्रदान करण्यात आली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे,
ज्योती राठोर, जयेश राठोर, अ‍ॅड. परदेशी व विनित परदेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button