कोल्हापूर : ई वॉर्डचा पाणीपुरवठा शनिवार, रविवारी बंद | पुढारी

कोल्हापूर : ई वॉर्डचा पाणीपुरवठा शनिवार, रविवारी बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : थेट पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे फुलेवाडी येथील काम शनिवारी (दि. 2) सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. परिणामी, कोल्हापूर शहरातील सर्वात मोठ्या ई वॉर्डसह परिसरातील पाणीपुरवठा शनिवारी आणि रविवारी (दि. 2 व 3 डिसेंबर) बंद राहणार आहे. तसेच सोमवारी (दि. 4) अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

शहरातील कसबा बावडा टाकीवरील संपूर्ण बावडा परिसर, लाईन बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, ताराबाई पार्क टाकीवरील सदर बाजार परिसर, कनाननगर, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, टेंबलाई टाकीवरील विक्रमनगर, उचगाव, टेंबलाई टाकी परिसर, टाकाळा, कावळा नाका टाकीवरील साईक्स एक्स्टेंशन, शाहूपुरी, रेल्वेस्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, मार्केट यार्ड, बापट कॅम्प या भागात पाणीपुरवठा होणार नाही. महापालिकेच्या टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.

Back to top button