बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू ; पिंजरा लावण्याची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू ; पिंजरा लावण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा : हिवरे बुद्रुक (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (दि. 28) पहाटे चारच्या सुमारास राजेश शंकर बेनके यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्याने प्रवेश करून दोन शेळ्या फस्त केल्या. या परिसरामध्ये बिबट्याचा वावर गेल्या अनेक दिवसांपासून आहे. राजेश शंकर बेनके यांनी शेळ्या बांधण्यासाठी पत्र्याचा बंदिस्त शेड केला आहे, परंतु बिबट्याने पत्रा वाकवून आत प्रवेश केला व शेळी आणि तिचं बकरू यांना ठार केले. याबाबतची माहिती बेनके यांनी वन विभागाला दिली असून, वनविभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. बेनके यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळणार आहे.

हिवरे बुद्रुक भोरवाडी परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वाढत असून, पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, दुसर्‍या दिवशीदेखील सायंकाळी सहा आणि सात वाजता बिबट्या या परिसरामध्ये फिरत होता, अशी माहिती राजेश बेनके यांनी दिली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news