धक्कादायक ! अनैसर्गिक संबंधाला नकार; पत्नीला दिला शॉक | पुढारी

धक्कादायक ! अनैसर्गिक संबंधाला नकार; पत्नीला दिला शॉक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : अनैसर्गिक संबंधाला नकार देणार्‍या पत्नीला पतीने विजेचा शॉक देत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित पतीविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील कसबा भागात ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दाखल केली. तिचा पती तिच्याकडे अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता. परंतु त्याची ही मागणी पत्नी साफ धुडकावून लावत होती. त्यामुळे त्याने पत्नीला जीवे मारण्याचा कट रचला. ती गाढ झोपेत असताना त्याने तिच्या पायाच्या दोन्ही अंगठ्यांना इलेक्ट्रीक वायर गुंडाळत तिला शॉक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button