Rise Up : जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Rise Up : जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी आयोजित राईझ अप पुणे महिला क्रीडा स्पर्धेतील महिला जलतरण स्पर्धा डेक्कन येथील टिळक जलतरण तलावावर पार पडली. या स्पर्धा 54 प्रकारात झाल्या. सात वर्षांखालील ते सतरा वर्षांपर्यंतच्या महिला खेळाडूंसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये हार्मनी अ‍ॅक्वेटिक क्लबच्या त्विषा दीक्षितने सर्वाधिक 25 गुण मिळवत वैयक्तिक प्रकारात अव्वल कामगिरी केली. डेक्कन जिमखाना क्लबने 126 गुण मिळवत चॅम्पियनशिपचा मान मिळविला आहे.

दै. पुढारीच्या वतीने आयोजित राईझ अप सिझन -2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक
म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्युट, बॅकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य लाभले.

वैयक्तिक कामागिरी करणार्‍या त्विषाला रोख पोरितोषिक

दै. 'पुढारी' आयोजित राईझ अप पुणे महिला जलतरण स्पर्धेत वैयक्तिक कामगिरी
करणारी हार्मनी ऍक्वेटिक क्लबची त्विषा दीक्षितने चमकदार कामगिरी केली. त्याबद्दल सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. संजय चोरडीया यांनी त्विषाला 21 हजार रुपये रोख आणि भविष्यातील शिक्षण सूर्यदत्त इन्स्टिट्युटमध्ये घेतल्यास संपूर्ण मोफत करू, अशी घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून प्रा.डॉ.चोरडीया यांनी केलेल्या घोषणेचे स्वागत केले.

सात वर्षाखालील खेळाडूंनी घेतले लक्ष वेधून

सात वर्षाखालील गटापासून ते 17 वर्षाखालील गटापर्यंतच्या खेळाडूंसाठी विविध वयोगटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात सात वर्षाखालाली गटातील मुलींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी दै.पुढारीच्या वतीने या गटातील सर्व सहभागी स्पर्धकांना चॉकलेट देऊन सन्मानित करण्यात आले.

मुलांमधील गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध करून देत दै.पुढारी आयोजित राईझ अप पुणे महिला क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मुलींना प्रोत्साहन दिले जात आहे. जलतरण क्रीडा प्रकारात पालकही आपल्या पाल्यांना सहभागी करत आहेत. हे पाहून समाजात सकारात्मक परिवर्तन होत असल्याचे समाधान आहे. या स्पर्धेसाठी दै. 'पुढारी'चे आभार मानावे तितके कमी आहेत.

– परेश कोल्हटकर, संचालक (कैलास जीवन)
आयुर्वेद संशोधनालय, प्रा. लि., पुणे.

दै. पुढारी आयोजित राईझ अप महिला क्रीडा स्पर्धेमुळे मुलींना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. सातत्याने अशा स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात, ज्यातून मुलींमधील गुणवत्तेला वाव मिळेल. आज झालेली जलतरण स्पर्धा पाहून मन भरून आले आहे. या स्पर्धेसाठी दै.पुढारीचे मनापासून आभार.

– डॉ. निखिल गोसावी, एम्ब—ायोनिक आयव्हीएफ
फर्टिलिटी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पुणे

दै. पुढारी आयोजित राईझ अपमधील जलतरण स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात त्विषा दीक्षितने सर्वाधिक 25 गुण मिळवत प्रथम क्रमांक पाटविला. त्विषा ही नरेंद्र आणि भूपेंद्र आचरेकर यांच्या मार्गदर्शनात हार्मनी अ‍ॅॅक्वेटिक क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे. ती म्हणाली, या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून मला स्वतःला सिद्ध करता आले. स्पर्धा आयोजित केल्याबद्दल दै. पुढारीचे धन्यवाद.

– त्विषा दीक्षित, जलतरणपटू.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news