Pune Crime News : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक | पुढारी

Pune Crime News : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने 27 लाखांची फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अनिवासीय भारतीय (एनआरआय) कोट्यातून मेडिकलला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने 27 लाख 27 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश शिंदे, पवन सूर्यवंशी आणि राहुल तुपेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेंद्र खंडेराव देशमुख (59, रा. वसंत कमल विवाह सोसायटी, दिगंबर कॉलनी, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवन सूर्यवंशी हा फिर्यादी देशमुख यांच्या ओळखीचा होता.

देशमुख यांना त्यांच्या मुलीसाठी मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. याबाबत सूर्यवंशीला समजल्यानंतर त्याने देशमुख यांच्या मुलीचे अ‍ॅडमिशन मेडिकलला करून देतो, असे आमिष दाखवून जयेश शिंदे याच्याशी ओळख करून दिली. दरम्यान, जयेश शिंदे याने एनआरआय कोट्यातून तिला प्रवेश मिळेल, असे सांगून देशमुख यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 26 हजार ऑनलाइन व कॅश स्वरूपात घेऊन फिर्यादी यांच्या मुलीचे अ‍ॅडमिशन न करता देशमुख यांचे पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Kolhapur Rain : अवकाळी पावसाची धामणी खोऱ्यास भिती

सांगली : कृष्णाकाठावर हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य

Nashik News : उकळती भाजी अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

 

Back to top button