Nashik News : उकळती भाजी अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू | पुढारी

Nashik News : उकळती भाजी अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- घरात खेळताना अंगावर गरम भाजी सांडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या एक वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीनिधी गणेश भोसले (रा. सुभाषरोड, नाशिकरोड) असे चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनिधी घरात खेळत असताना तिच्या अंगावर उकळती भाजी पडली. गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. उपचारादरम्यान, चार दिवसांनंतर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा :

Back to top button