Pune News : तिमिराकडून तेजाकडे; दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आज दीपोत्सव | पुढारी

Pune News : तिमिराकडून तेजाकडे; दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने आज दीपोत्सव

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज (दि.25) रोजी श्रीवृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, बालगंधर्व चौकाजवळ, शिवाजीनगर, पुणे येथे सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला कस्तुरी सभासद व शहरातील महिलावर्गाने आवर्जून हजेरी लावावी.

प्रत्येक महिलांनी येताना सोबत स्वत:ची पणती, तेल वात, काडीपेटी किंवा मेणाच्या पणत्या घेऊन यावे. तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून यावे. या कार्यक्रमास सुकांता शुध्द शाकाहारी भारतीय थाळी यांचे सहकार्य मिळाले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी कस्तुरी सभासद नोंदणी सुरू राहील. अधिक माहितीसाठी 020-25003316 नंबरवर संपर्क साधावा.

हेही वाचा

नागपूर : तीन इंजिन काय आग लावायला आहेत का? : नाना पटोले

पायी चालण्यासाठी सर्वात लांब रस्ता

नागपूर : भुजबळांकडून ही अपेक्षा नव्हती : राधाकृष्ण विखे पाटील

 

Back to top button