नागपूर : तीन इंजिन काय आग लावायला आहेत का? : नाना पटोले | पुढारी

नागपूर : तीन इंजिन काय आग लावायला आहेत का? : नाना पटोले

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा राज्यात वातावरण दूषित करण्याचं काम भाजप करत आहे. मनोज जरांगे पाटील जिथे उपोषण करत होते, तिथे लाठीचार्ज करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते. जबरदस्तीने त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. राज्याचे मंत्री असे बोलत असतील ते हे सरकार प्रणित नाही का? आम्ही यात नव्हतो, हे दाखवण्याकरता सरकार आता निष्पाप लोकांवर कारवाई करत आहेत. सत्तेत असताना राज्य शांत का करत नाही? या सगळ्यावर तोडगा जातीनिहाय जनगणना हाच आहे. सत्तेत असताना हे का करत नाहीत. मग तीन इंजिन काय आग लावायला आहेत का? असा रोखठोक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

ओबीसी मेळावा संदर्भात बोलत असता राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा विषय मांडला आहे. संघाने यापूर्वीच आरक्षण मुक्त भारत करा असं म्हटले आहे. तेच बीजेपी करत आहे. आम्हाला मागास लोकांना, आर्थिक शोषित लोकांना न्याय द्यायचा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सभेसाठी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले होते. मात्र, ते तेलंगणा येथे प्रचारात जाणार असल्याने ते येऊ शकणार नाहीत. प्रतिनिधी येतील. मला जायला सांगितले. मी जाणार आहे.

सध्या बदल्या जोरात आहेत. कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खाण्याचे काम सरकारमध्ये सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा क्राईम पण वाढत आहे. आरक्षणाची आग कोणी पेटवली होती? भंडारा गोंदियाच्या सभेत सांगितलं देशात आम्हाला आरक्षण द्यायचं सांगितलं होतं. आता त्यांनी आरक्षण द्यावे. मग कोर्टात यांचे समर्थक वकील जातात. न्यायव्यवस्थेत टिकणार आरक्षण द्यावे. राज्यात सरकार अस्थिर आहे. कुणाला डेंग्यू होतो आणि नंतर अचानक दिल्लीत पोहोचतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 मंत्री गायब असतात. बदल्यामध्ये गडबडी सुरू आहेत. केंद्र सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button