Devendra Phadanavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन

Devendra Phadanavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतले लक्ष्मी-नृसिंहाचे दर्शन
Published on
Updated on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 23) निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे कुलदैवत श्री लक्ष्मी- नृसिंहाचे सपत्नीक दर्शन घेत अभिषेक केला. श्री लक्ष्मी-नृसिंह हे देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. पंढरपूर येथून परत येत असताना त्यांनी नृसिंहाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी होम हवन करत अभिषेक केला. या प्रसंगी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते,आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, सरपंच अश्विनी सरवदे, उपसरपंच रेणुका काकडे, उदयसिंह पाटील, सहाय्यक संचालक विलास वाहने, प्रांताधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर आरगडे, विश्वस्त प्रशांत सुरू आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

कुलदैवत लक्ष्मी-नृसिंहाच्या दर्शनासाठी नेहमी येत असतो. मागील काही दिवसांपासून माझे येणे झाले नव्हते. त्यामुळे एक ओढ होतीच. सुदैवाने पंढरपूरला कार्तिकी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाचा योग आला. त्यानंतर लक्ष्मी- नृसिंहचरणी लीन झालो. लक्ष्मी-नृसिंह सर्वज्ञ आहेत. त्यांना काही मागावे लागत नाही. मनात असतं ते मिळतं, असे फडणवीस यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील कुणबी दाखले नाहीत अशांनाही आरक्षण मिळेल असे सांगत आहेत. यावर विचारताच मंदिरात याबाबत बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news