Afghanistan Embassy : अफगाणिस्तान भारतीय दूतावास कायमस्वरूपी बंद करणार

Afghanistan Embassy
Afghanistan Embassy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान दूतावासाने नवी दिल्लीत कायमस्वरूपी भारतीय दूतावास बंद करण्याची घोषणा केली आहे. एक नोटीस जारी करून, दूतावासाने म्हटले आहे की, २३ नोव्हेंबर २०२३ पासून नवी दिल्लीतील आमचे भारतीय दूतावास कायमचे बंद करण्याची घोषणा करताना आम्हाला खेद वाटतो आहे. अफगाण प्रजासत्ताकाचा एकही राजदुत भारतात शिल्लक नसल्याचेही नोटीसमध्ये म्हटले आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावासात सेवा देणारे लोक सुरक्षितपणे देशांमध्ये पोहोचले आहेत. (Afghanistan Embassy)

Afghanistan Embassy : तालिबान आणि भारत सरकारचा दबाव

अफगाण दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ८ आठवडे प्रतीक्षा करूनही राजनयिकांसाठी व्हिसा वाढवणे आणि भारत सरकारच्या वर्तनात बदल करण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. तालिबान आणि भारत सरकार या दोघांकडून नियंत्रण सोडण्यासाठी सतत दबाव आणल्यामुळे, दूतावासाला कठीण निवडीचा सामना करावा लागला. दूतावासाने सांगितले की, भारतातील मिशन बंद करण्याचा आणि मिशनचे कस्टोडियल अधिकार यजमान देशाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय अफगाणिस्तानच्या हिताचा आहे.

आम्ही भारतीय जनतेचे मनापासून आभार

दूतावासाच्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, अफगाण प्रजासत्ताकातील एकही राजदुत भारतात शिल्लक नाही. तालिबानशी संबंधित असलेला राजदुत असा एकमेव व्यक्ती भारतात उपस्थित आहे. आता मिशनचे भवितव्य ठरवणे भारत सरकारवर अवलंबून आहे. ती बंद ठेवायची की तालिबानच्या " राजदुत" कडे सोपवण्याच्या शक्यतेसह पर्यायांचा विचार करायचा आहे. पुढे नोटीसमध्ये," गेल्या 22 वर्षांत अफगाणिस्तानला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मदतीबद्दल आम्ही भारतीय जनतेचे मनापासून आभार"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news