Pimpri News : वाहनतळाअभावी देहूत बेशिस्त पार्किंग

Pimpri News : वाहनतळाअभावी देहूत बेशिस्त पार्किंग

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूगावामध्ये दररोज हजारो भाविक हे संत तुकोबांच्या दर्शनासाठी येत असतात. परंतु, देहू नगरपंचायतीच्या वतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे भाविकांना नाईलाजास्तव रस्त्यावरच वाहने लावावी लागत आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे.

वाहतूक कोंडीत भर

  • देहूगावमध्ये एक ब्रिटिशकालीन पूल आहे. तो कालबाह्य झाल्याने तो वाहतुकीस बंद केला आहे. त्याच्याच शेजारी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत नवीन पूल बांधण्यात आला आहे.
  • या ठिकाणी देहू नगरपंचायतीच्या वतीने वाहने लावू नयेत; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सूचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, देहू नगरपंचायतीच्या वतीने वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे नाईलाजास्तव भाविकांना कुठेही वाहने लावावी लागत आहेत.

वाहनतळ निर्माण करण्याची मागणी

  • तसेच, नवीन पूल, इंद्रायणीचा घाट किंवा रस्त्यावरच वाहने लावली जात आहेत. तर जे मुख्य वाहनतळ होते त्या ठिकाणी पीएमपीच्या बसेस लागतात. भाविकांनी आपले वाहन लावले तर संबंधित अधिकारी वाहन काढण्यास सांगतात.
  • त्यातच या ठिकाणी वाहने पार्क केली तर देहू नगरपंचायत 50 रुपये वसूल करत आहे. त्यामुळे देहू नगरपंचायतीने वाहनतळाची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. वाहने लावले की नगरपंचायतीची 50 रुपयांची पावती तसेच पोलिसांची दंडात्मक कारवाई यामुळे देहूमध्ये दर्शनासाठी यावे की नाही, असा प्रश्न भाविकांच्या पुढे उभा राहिला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news