Weather update : राज्यातील अवकाळी पाऊस झाला कमी | पुढारी

Weather update : राज्यातील अवकाळी पाऊस झाला कमी

पुणे : राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या तुरळक भागांत गेल्या दोन दिवसांपासून विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह बरसणारा मुसळधार पाऊस आता कमी झाला आहे. दरम्यान, कोकण वगळता उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्राच्या मध्य पूर्व आणि दक्षिण पश्चिम भागावर कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्याची तीव्रता कायम आहे. परिणामी, कोकण,घाटमाथ्यासह सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान, शुक्रवारी पुण्यासह रत्नागिरी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

आता मात्र हा अवकाळी पाऊस कमी होणार आहे. त्यामुळे हवामान कोरडे राहून किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे..

  हेही वाचा

Back to top button