

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील कडूस गावचे तत्कालीन ग्रामविकास अधिकार्याला मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी निलंबित केले आहे. कामात कसूर केल्याप्रकरणी बाळासाहेब माने या ग्रामविकास अधिकार्यावर कारवाई केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. बाळासाहेब माने हे सध्या हवेली पंचायत समितीत कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते कडूस ग्रामपंचायतीत ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.
त्या वेळी माने यांनी ग्रामपंचायतीची लेखापरीक्षण अहवालाची माहिती न दाखविणे, करापोटी जमा झालेली रक्कम बँकेत भरणा न करता परस्पर खर्च करणे, काही पावत्यांच्या तारखेमध्ये खाडाखोड करून वसूल रक्कम स्वत: जवळ बाळगणे, दरपत्रके न मागविता साहित्य खरेदी करणे आदी प्रकार केल्याचे उघडकीस आले. यामुळे माने यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे निलंबनाचे मुख्यालय पंचायत समिती इंदापूर हे राहील, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा :