Pune News : पुणेकरांच्या हौसेचा नाद नाही; आवडत्या क्रमांकासाठी तिप्पट शुल्क | पुढारी

Pune News : पुणेकरांच्या हौसेचा नाद नाही; आवडत्या क्रमांकासाठी तिप्पट शुल्क

पुणे : दुचाकी वाहनांसाठी नवीन क्रमांकाची मालिका सुरू केली जाणार असून, त्याती आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सार्‍या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहनमालकांनी विहित तीनपट शुल्कासह मंगळवारी (दि.7) सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.

एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) बुधवारी (दि.8) दुपारी 2.30 पर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल. अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा.

हेही वाचा

Back to top button