Drug case : ललितची गर्लफ्रेंड मनोरुग्ण ! बचाव पक्षाचा दावा | पुढारी

Drug case : ललितची गर्लफ्रेंड मनोरुग्ण ! बचाव पक्षाचा दावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ड्रग तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणातील आरोपी अ‍ॅड. प्रज्ञा कांबळे ही मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचा दावा शिवाजीनगर न्यायालयात करण्यात आला आहे. अ‍ॅड. कांबळे हिच्या वकिलांनी त्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमली पदार्थ प्रकरणात अ‍ॅड. प्रज्ञा कांबळे हिला आरोपी करण्यात आले आहे. नाशिक पोलिसांनी प्रज्ञाला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी तिचा ताबा घेतला.

सध्या प्रज्ञा पोलिस कोठडीत आहे. तिची कोठडी मंगळवारी (दि. 7) संपणार असून, तिला शिवाजीनगर न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, प्रज्ञाच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जात त्यांनी प्रज्ञा ही मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे नमूद केले आहे. तसेच, ती 2019 पासून उपचारही घेत आहे. त्याची पुष्टी करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button