पुण्यात सध्या ‘ स्मॉग चल रहा है’ ; प्रदूषणाने पुणेकर हैराण | पुढारी

पुण्यात सध्या ' स्मॉग चल रहा है' ; प्रदूषणाने पुणेकर हैराण

आशिष देशमुख

पुणे : शहरात रविवारी हंगामातील सर्वोच्च प्रदूषणाची नोंद झाल्याने सफर संस्थेने शहराला प्रदूषणाचा ऑरेंज अलर्ट दिला. तिसर्‍या दिवशी पुणेकर प्रदूषणाने हैराण झालेले दिसले. शहरात सर्वत्र खरेदीसाठी इतकी गर्दी होती की, रस्त्यांवर वाहने अन् माणसेच दिसत होती. मंडई परिसरात प्रदूषित स्मॉगचा डोंब स्पष्ट दिसत होता. शिवाजीनगर, भूमकर चौक, भोसरीत हंगामातील सर्वोच्च प्रदूषणाची नोंद झाली.  शुक्रवारपासून (दि. 3) शहरात सर्वत्र गर्दीचा पूर पाहावयास मिळत आहे. शनिवारी ही गर्दी आणखी वाढली अन् रविवारी गर्दीने कळस गाठला.
संबंधित बातम्या :

 

पुणेकरांनी दिवाळीची मनसोक्त खरेदी केली, पण सर्वांना वाहनप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्याला तर क्षणभर विश्रांती मिळाली नाही. सकाळी 9 पासून गर्दी झाल्याने प्रदूषणाची पातळी वाढण्यास सुरुवात झाली. दुपारी 3 ते 5 या वेळेत सर्वोच्च प्रदूषण नोंदवले गेले, तर सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत पुन्हा ही पातळी वाढली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व पुण्यातील सफर या संस्थेने ही पातळी नोंदवली. यात सूक्ष्म धुलिकण 10 व अतिसूक्ष्म धुलिकण 2.5 यांची पातळी सर्वोच्च होती. सायंकाळी 6 वाजता शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता 180 मायक्रो ग्राम प्रतिक्युबिक मीटर इतकी होती.
ढगाळ वातावरणाने अधिक प्रभाव..
सफर संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने उकाडा खूप जाणवत होता. शिवाय धुलिकणांचे लोट हवेत खालच्या थरात अडकलेले दिसत होते.
पाऊस नसल्याने आकाश निरभ— होते. त्यामुळे शहरात धूर, धूळ आणि धुके (स्मॉग) असा डोंब वाहन प्रदूषणाने तयार झाला. त्यामुळे शहरातील दृष्यमानता कमी झाली होती. वाहन प्रदूषणात रस्त्यावरच्या धुळीचाही समावेश होता.
                                                             -डॉ. बी. एस. मूर्ती, प्रकल्प संचालक,सफर संस्था,पुणे.

Back to top button