पुढारी आनॅलाईन डेस्क : गाझामधील रुग्णालयांच्या आसपासच्या भागांवर रविवारी रात्री जोरदार बॉम्बफेक करण्यात आली. आता गाझा पट्टीचे दोन भाग करण्यात आले आहेत, असा दावा इस्त्रायलच्या सैन्य दलाने केला आहे. रविवारी रात्रीपासून गाझा शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद होती. युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची ही तिसरी वेळ आहे. ( Israel-Hamas War Updates )
इस्रायल-हमास युद्धाच्या आज (दि. ६) २९ वा दिवस आहे. अमेरिकेने आपल्या नेतृत्वाखाली मध्यपूर्वेत आण्विक पाणबुड्या पाठवल्या आहेत. ओहायो वर्गाच्या या पाणबुड्या अण्वस्त्रांनी सुसज्ज आहेत. मध्यपूर्वेत, भूमध्य समुद्र, लाल समुद्र, पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखातात अमेरिकेची वर्चस्व आहे. मात्र, अण्वस्त्र पाणबुडी कुठे तैनात करण्यात आली आहे, हे अमेरिकन लष्कराने स्पष्ट केलेले नाही. ( Israel-Hamas War Updates )
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे हमासविरुद्ध लढणाऱ्या आपल्या सैनिकांना सातत्याने भेट घेत आहेत. रविवारी नेतान्याहू यांनी हवाई दलाच्या तळावर सैनिकांची भेट घेतली. युद्ध जिंकेपर्यंत गाझावर बॉम्बफेक थांबवणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महिनाभरानंतर हमास हल्ल्याची चौकशी सुरू होते
नेतन्याहू सरकार, इस्रायल डिफेन्स फोर्स (आयडीएफ) आणि गुप्तचर संस्था (मोसाद, मिलिटरी इंटेलिजन्स आणि स्थानिक नेटवर्क) ७ ऑक्टोबरला एवढा मोठा हल्ला करण्यात हमास कसा यशस्वी झाला याचा तपास करणार आहेत. दरम्यानहमासकडे मोठे हल्ले करण्याची ताकद नसल्याचा लष्कराचा समज हे या हल्ल्यामागचे पहिले आणि महत्त्वाचे कारण होते. इस्त्रायलचा म्हणजे ती अतिआत्मविश्वासाची बळी ठरले, असे वृत्त इस्रायलमधील 'जेरुसलेम पोस्ट'ने दिले आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने रविवारी प्रसारमाध्यमांना चार तास गाझामधील परिस्थिती पाहण्याची परवानगी दिली. 'न्यूयॉर्क टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानंतर गाझामधील विध्वंस स्पष्टपणे दिसत असून शाळा, धार्मिक स्थळांची पडझड झालेली आहे. इस्रायली सैन्य अधिकार्यांनी पाश्चात्य जगातून पत्रकारांना उत्तर गाझाच्या काही भागात नेले जेथे जोरदार लढाई झाली.
रविवार ५ नोव्हेंबर रोजी इस्रायली सैन्याने २४ तासांत तीन निर्वासितांच्या छावण्यांवर हल्ला केला. इस्रायलने सर्वात मोठ्या जबलिया छावणीवर हल्ला केला. त्यानंतर अल-बुरेज आणि माघाजी छावणीवर हल्ला केला. सर्वात मोठ्या जबलिया कॅम्पमध्ये 1.16 लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. त्याचवेळी अल बुरेझमध्ये ४६ हजार निर्वासित आणि मघाजीमध्ये ३३ हजार निर्वासित राहत आहेत. 24 तासात या हल्ल्यात किती लोक मारले गेले याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
हेही वाचा :