लोकसभेसाठी प्रशासकीय हालचालींना वेग 

file photo
file photo
Published on
Updated on
पुणे : पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असून, त्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे 72 हजार अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांची जुळवाजुळव केली जात आहे. यासाठी सर्व शासकीय विभागांकडून कर्मचार्‍यांची माहिती मागविण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात लोकसभेचे पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती असे चार मतदारसंघ आहेत. त्यात 21 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघांसाठी 8 हजार 213 मतदान केंद्रे असणार आहेत. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा 38 केंद्रे नव्याने तयार करण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असणार आहेत. तसेच तब्बल 625 इमारतींमधील केंद्रांची जागा विविध कारणास्तव बदलण्यात आली आहेत.
एका मतदान खोलीवर 1500 मतदार मतदान करू शकणार आहेत, त्यापुढील मतदारांना त्याच मतदान केंद्रावर दुसर्‍या खोलीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे एकाच मतदान खोलीवर मतदारांची गर्दी, रांगा लागणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
पुण्यातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि उर्वरित ग्रामीण भागातील दहा, अशा एकूण 21 विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणुकीचे काम 'नको रे बाबा'!

निवडणूक ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, मोठ्या जबाबदारीने काम काम करावे लागते. कामामध्ये थोडीही चूक झाल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे निवडणुकीचे काम अनेक कर्मचार्‍यांना नको असते. निघालेले आदेश रद्द करण्यासाठी कर्मचारी आपण किंवा पत्नी, आई आजारी असल्याचे कारण पुढे करून आदेश रद्द करून घेण्याचा प्रयत्न करतात.

25 टक्के अतिरिक्त कर्मचारी

जिल्ह्यात 8 हजार 213 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एका केंद्रावर सात अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  तसेच एकूण कर्मचार्‍यांच्या 25 टक्के कर्मचारी हे अतिरिक्त नियुक्त केले जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. दुसरीकडे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. नाव नसल्यास नावनोंदणी करावी तसेच काही दुरुस्ती असल्यास ती करून घ्यावी. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
– मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news