एका संघटनेकडून अनधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा; कुस्तीपटूंची होतेय दिशाभूल

एका संघटनेकडून अनधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा; कुस्तीपटूंची होतेय दिशाभूल
Published on
Updated on
पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकीय हित साधण्यासाठी काहींनी अनधिकृत संघटना स्थापन केली असून त्यामार्फत महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा अनधिकृत असून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हीच अधिकृत संघटना असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला माजी खासदार अशोक मोहोळ, अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, रुस्तम ए हिंद अमोल बुचडे, हिंद केसरी अमोल बराटे, महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड आणि ललित लांडगे उपस्थित होते.
लांडगे म्हणाले, 1960 सालापासून महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद  आयोजित करीत आहोत. काहीच दिवसांपूर्वी एका संघटनेने अनाधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यामध्ये होणार आहे असे जाहीर केले व ज्या भारतीय कुस्ती संघाची जानेवारी 2023 मध्ये भारत सरकार आणि भारतीय ऑलिंपीक संघटनेने भारतीय कुस्ती संघाची कार्यकारणी बरखास्त करून अस्थायी समिती मार्फत कारभार ताब्यात घेतला आहे. तसेच जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाची संलग्नता काढुन टाकली आहे.
अशा बरखास्त झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाची संलग्नतापत्र दाखवुन सर्व कुस्तीगीरांमध्ये दिशाभुल करून गैरसमज पसरवीत आहे.
अशा अवैध्य नविन निर्माण झालेल्या संघटनेने स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्राचे व पैलवानांचे नुकसान करत आहे. हे करत असताना पक्षीय राजकारण खेळामध्ये आणले जात आहे, असे दिसुन येत आहे. तरी अशा अपप्रवृत्ती असणार्‍या लोकांना व संघटनेला पैलवानांनी व कुस्ती जिल्हा कुस्ती संघानी कसल्याही प्रकारचे सहकार्य करू नये असे अहवान लांडगे यांनी यावेळी केले.

धाराशिव येथे रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व उस्मानाबाद तालीम संघ यांच्या सहकार्याने 65 वी वरिष्ठ गादी व माती राज्य अजिंक्यपद कुरती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत तुळजाभवानी स्टेडियम, धाराशिव, उस्मानाबाद या ठिकाणी 16 ते 20 नोव्हेंबरला होणार आहे.

गदेची परंपरा मोहोळ कुटुंबाकडे…

महाराष्ट्र केसरी किताबाची गदा परंपरेने कै मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबीयातर्फे यावेळेस धाराशिव येथे होणान्या 65 वी वरिष्ठ गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 या कुस्ती स्पर्धेत देण्यात येणार आहे, असे माजी खासदार अशोक मोहोळ यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र केसरीत पारितोषिकाची बरसात

धाराशिव येथे होणार्‍या महाराष्ट्र केसरीतील किताबाच्या मानकरी मल्लाला स्कॉर्पिओ, उपविजेत्याला टॅक्टर, प्रत्येक गटातील विजेत्याला बुलेट, द्वितीय विजेत्याला स्पलेंडर तर तुतीय विजेत्याला 25 हजार रुपये रोख असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news