पिंपरी शहरातील जलजीवनाचा होतोय र्‍हास

पिंपरी शहरातील जलजीवनाचा होतोय र्‍हास
Published on
Updated on
पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर हे जैवविविधतेच्यादृष्टीने संपन्न शहर होते. मात्र, सध्या शहरातील पाण्याचे स्रोत नाहीसे होत चालले आहे. प्राण्यांना आसरा घेण्यासाठी झाडांची संख्याही कमी होऊ लागली आहे. नद्यांचे रूपांतर नाल्यांमध्ये झाले आहे, पाणी अशुद्ध होऊन वेगवेगळी रसायने मिश्रित झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती आपण गमावत चाललो आहोत.
मोठ्या प्रमाणात वाढत्या शहरीकरणामुळे मैलामिश्रित पाणी नदीमध्ये सोडले जाते. तसेच घरातील रसायने, औद्योगिक रसायनमिश्रित पाणी यामुळे पाण्याचे रसायनिक गुणधर्म नाहीसे झाले आहेत. दूषित नद्यांमुळे जलपर्णीसारख्या वनस्पतींची वाढ होत आहे. त्यामुळे पाण्यात स्थानिक देशी वनस्पती हद्दपार झाल्या आहेत. पाण्याची रासायनिक गुणवत्ता बदलल्यामुळे देशी वनस्पती रोडावल्या, त्याचा थेट परिणाम तेथील जलजीवनावर झाला आहे.

गोड्या पाण्याचा पुरवठा बंद

शहरातील नद्यांना वर्षभर जोडणारे ओढे होते. या ओढ्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नदीला ताजा गोड्यापाण्याचा जो पुरवठा व्हायचा तो बंद झाला. काही जिवंत झरे नदीच्या काठावर होते तेदेखील वाढत्या अतिक्रमणामुळे बुजविले गेले. तसेच ब्लू लाईन व रेडलाईनमधील चुकीची विकासकामे आहेत. त्याचा थेट परिणाम तेथील स्थानिक जैवविविधतेवर झाला. त्यामुळे याठिकाणी असणार्‍या पाण वनस्पती होत्या त्या हद्दपार झाल्या. त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे मासे किंवा इतर जलचर ते नामशेष झाले.

नदीकाठावर अतिक्रमण

नदीकाठावरील वन हे नदीला जिवंत ठेवणारी बाब आहे. या नदीकाठावर काही ठराविक वनस्पती मोठ्या प्रमाणात एकेकाळी होत्या. मात्र, नदीकाठावर आज अतिक्रमण पहायला मिळत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शुद्धिकरण हा जो  नदीचा प्रकार असतो तो बंद झाला. नदीकिनारी असणारी देशी वृक्ष करंज, वाळुंज, भोकर, शिंदीची झाडे झपाट्याने कमी झाली आहेत.

सत्तर ते ऐंशी टक्के मासे नामशेष

  • परकीय माशांचे प्रमाण नदीमध्ये वाढल्यामुळे स्थानिक सत्तर ते ऐंशी टक्के मासे नामशेष झाले आहेत. चिलापी नावाचा परकीय मासा वाढला. त्याने माशांचा कितीतरी जाती नष्ट केल्या आहेत. परकीय जलचर आणि वनस्पती यांचे आक्रमण आपल्या जलसंपत्तीवर होत आहे.

पाणथळ जागा कमी

  • पाणथळ जागा असतात त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात जलचरांचे प्रजनन होत असते. या पाणथळ जागेत काही परदेशी पक्षीदेखील विशिष्ट काळात येत असतात. पण पाणथळ जागा कमी झाल्याने त्यांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.

नदीमध्ये राडारोडा

बांधकामांचा राडारोडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात नदीपात्रात टाकला जातो. त्यामुळे चांगले नदीकाठ हे खराब होतात.
जलजीवनावर वाढते शहरीकरण व औद्योगिकरणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पाण्याचे रासायनिक गुणधर्म नष्ट झाले आहेत. त्यामुळे देशी वनस्पती, जलजीव हे नामशेष झाले आहेत. नदीठिकाणी बांधकामांचा राडारोडा आणून टाकल्याने नदीकाठावरची दलदल नाहीशी झाली आहे. पर्यावरणाविषयी जे कायदे आहेत. ते भंग करणार्‍यांवर योग्य ती कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
-सचिन पुणेकर, पर्यावरण शास्त्रज्ञ
हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news