Pune Grampanchayat News : शेळगावात बनले आदर्श मतदान केंद्र; फुलांची कमान, हिरकणी कक्ष,आकर्षक रांगोळी, गुलाबपुष्पाने स्वागत | पुढारी

Pune Grampanchayat News : शेळगावात बनले आदर्श मतदान केंद्र; फुलांची कमान, हिरकणी कक्ष,आकर्षक रांगोळी, गुलाबपुष्पाने स्वागत

शेळगाव(ता.इंदापूर); वृत्तसेवा : रंगबेरंगी फुलांची केलेली कमान मतदारांसाठी घालण्यात आलेला मंडप, मतदारराजाच्या स्वागतासाठी गुलाबपुष, आकर्षक रांगोळी, तसेच स्नदा मातासाठी उभारण्यात आलेले हिरकाणी कक्ष, जागोजागी माहीती फलक, पिण्याच्या पाण्याची सोय,स्वच्छतागृह तसेच अन्य पुरविण्यात आलेल्या आलेल्या सुविधाने शेळगाव तालुका इंदापूर येथील तेलओढा वार्ड क्रमांक पाच मतदारराजाचे लक्ष वेधून घेत आहे. आदर्श मतदान केंद्र ठरले आहे.

शेळगाव  ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 5 )सहा प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली. पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे वर्ग मतदान केंद्र बनले. त्यामध्ये तेलओढा येथील वार्ड क्रमांक पाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मतदान केंद्र हे आगळेवेगळे आदर्श मतदान केंद्र शेळगाव ग्रामपंचायत चे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांच्या संकल्पनेतून बनवले असून इंदापूर तालुक्यात आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच हा उपक्रम ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी राबविल्याने शेळगाव सह इंदापूर तालुक्यातील त्यांचे कौतुक होत आहे. वार्ड क्रमांक पाच मध्ये मतदान केंद्रावर आल्यावर मतदार राजाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसून येत होता.

मतदान केंद्रावर आकर्षक फुलांच्या वेगळ्या रंगांची कमान उभारण्यात आली होती त्याचप्रमाणे त्या कमानीवरती मतदानासाठी आवश्यक लागणारे कागदपत्राची माहिती देखील देण्यात आली होती, त्याचप्रमाणे आकर्षक मंडप देखील टाकण्यात आला होता त्याचप्रमाणे आकर्षक रांगोळी काढून रांगोळीच्या माध्यमातून मतदान माझा अधिकार मतदान करू या असे संदेश देण्यात आला. अपंग मतदारांसाठी व्हीलचेअरची देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली होती.

यावेळी सकाळी मतदान केंद्रावर सर्व उमेदवारांच्या व मान्यवरांच्या हस्ते मतदान मशिन चे पूजन करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ, मोहन दुधाळ, फक्कड ननवरे, विलास भांगे, बाळासाहेब ठोंबरे, उमेश ननवरे, बाळू भोंग सह सर्व उमेदवार व मतदार उपस्थित होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी सांगितले की लोकशाहीने सर्व नागरिकांना मतदान हक्क बजावण्याचा अधिकार दिला आहे व मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदान हक्काबाबत प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यासाठी व जास्तीत जास्त मतदान घडून आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्या असल्याचे देखील जगताप यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

खेड तालुक्यात प्रथमच बिल्डरच्या कार्यालयात दस्तनोंदणी

Back to top button