Pimpri News : स्टिकर अन् आर्टिफिशिअल रांगोळीचा ट्रेंड | पुढारी

Pimpri News : स्टिकर अन् आर्टिफिशिअल रांगोळीचा ट्रेंड

पिंपरी : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारांत दिवाळीचा झगमगाट दिसून येत आहे. दिवाळी खरेदीच्या लगबगीने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीत महत्त्व असते ते रांगोळीचे. दारासमोर, अंगणात रांगोळी ही असतेच असते. त्यामुळे दिवाळीसाठी रांगोळीचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.

दिवाळीसणानिमित्त बाजारात आणि हातगाडीवर रांगोळी व रांगोळीचे रंग विक्रीस पहायला मिळत आहेत. दिवाळीसणात पारपंरिक रांगोळीचा ट्रेंड आजही पहायला मिळातो आणि ही रांगोळी दिसतेदेखील छान. पांढर्‍या रंगाची रांगोळी आणि त्यामध्ये असणारे विविध रंग हे पाहणार्‍याला आकर्षित करतात. रंगाचेदेखील विविध प्रकार पहायला मिळत आहेत. रांगोळ्यांच्या लहान पुड्या 10 रुपये पासून उपलब्ध आहे.

स्टिकर, आर्टिफिशिअल रांगोळी

सध्या फ्लॅट संस्कृतीमुळे घराला अंगण नाही. त्यामुळे कुठेतरी छोट्या स्वरूपात रांगोळी रेखाटली जाते. त्यामुळे रांगोळ्यामध्ये स्टिकर रांगोळी आणि आर्टिफिशिअल रांगोळीचा ट्रेंड वाढत आहे. बाजारात रांगोळीचे स्टिकर मिळतात. छोट्या-मोठ्या आकारात हे रांगोळीचे स्टिकर एकदा लावले की झाले. तसेच रांगोळी डिझाईनचे छाप बाजारात विविध आकारात आणि नक्षीत उपलब्ध आहे.

तर काही कुंदन, खडे, टिकल्या आणि मोठ्या मण्याचा वापर केलेली आर्टिफिशिअल रांगोळीदेखील बाजारात उपलब्ध आहे.गोड्यांची तोरणे सण कोणताही असो दारावर तोरणे ही हमखास बांधले जाते. ही तोरणे विकत घेण्यासाठी महिलांचा उत्साह दिसून येत आहे. काच, कुंदन आणि गोंडे असलेली तोरणेही बाजारात उपलब्ध आहे. तसेच विविध रेडिमेड फुलांची तोरणेही उपलब्ध आहेत.

हेही वाचा 

कोल्हापूर : थेट पाईपलाईनच्या वीज पुरवठ्याची वायर कापल्याचा संशय

Pimpri News : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार; निषिद्ध वेळेतही अवजड वाहनांचा शहरात प्रवेश!

भाजपच्या कंबोज यांना दणका! सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला

Back to top button