Pune News : म्हाडाच्या घरांसाठी 60 हजार अर्ज | पुढारी

Pune News : म्हाडाच्या घरांसाठी 60 हजार अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 5 हजार 863 सदनिकांसाठी म्हाडाकडे 59 हजार 766 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. या घरासाठी सोडत 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिली.

म्हाडा पुणे विभागाने गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील 431 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344 सदनिका, प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजनेतील 2 हजार 445 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 हजार 445 सदनिका अशा एकूण 5 हजार 863 सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी
5 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.

अर्ज करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत 31 ऑक्टोबर रोजी संपली. या मुदतीत म्हाडाकडे 77 हजार 280 जणांनी अर्ज केले असून, त्यापैकी 59 हजार 766 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे अनामत रक्कम भरलेलेच म्हाडाच्या सोडतीसाठी पात्र ठरले आहेत.

सोडतीचे वेळापत्रक सोडतीसाठी

अर्जाची प्रारूप यादी :
8 नोव्हेंबर 2023
हरकती नोंदविण्याची
मुदत : 11 नोव्हेंबर 2023
सोडतीसाठी
अर्जाची अंतिम यादी
: 20 नोव्हेंबर 2023
सोडत :
24 नोव्हेंबर 2023

हेही वाचा

Nagar News : उपोषणकर्त्याची तब्येत खालावली ; उपचार सुरू

नाशिक : आमदार नितीन पवारांचा बॅनर फाडला; मराठा आंदोलक आक्रमक

Kolhapur News: कुरुंदवाड: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची अंत्ययात्रा काढून आंदोलन

Back to top button