Kolhapur News: कुरुंदवाड: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची अंत्ययात्रा काढून आंदोलन | पुढारी

Kolhapur News: कुरुंदवाड: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची अंत्ययात्रा काढून आंदोलन

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबाबत अत्यंत संथ गतीने काम करीत असल्याची टीका येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली. यावेळी येथील समाजाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम आणि अँड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच पालिकेसमोर नेत्यांच्या प्रतिकृती तिरडीला जोडे मारून दहन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत आक्रोश करण्यात आला. (Kolhapur News)

दरम्यान अंत्ययात्रा पालिका चौकात आल्यानंतर दहन करीत असताना आंदोलक आणि पोलिसांची झटापट झाली. पोलिसांनी अंत्ययात्रेवरील साहित्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांकडून नेत्यांची प्रतिकात्मक तिरडी हिसकावून घेत दहन केले. येथील पालिका चौकात सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, भुजबळ यांच्याविरोधी तीव्र आंदोलन करण्यात आले.  तर मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री राणे, रामदास कदम आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या अँड सदावर्ते यांच्या प्रतिमेची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढण्यात आली. (Kolhapur News)

आंदोलकाने तिरडी हिसकावून घेत, दहन करत बोंब-ठोक केले. सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीने मराठा समाज बांधवांनी आक्रोश व्यक्त केला. या आंदोलनात बबलू पवार, वैभव उगळे, राजू आवळे,अजित देसाई, राजू बेले, सुनील जुगळे, अनिल चव्हाण, संदीप बिरनगे, मिलिंद गोरे, प्रवीण खबाले, जितेंद्र साळुंखे आदी. समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Kolhapur News)

Back to top button