

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या समर्थनात संपूर्ण राज्य भरात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. अहमदनगर येथे मागील 5 दिवसांपासून तहसील कार्यालया जवळ साखळी उपोषण सुरू असून या उपोषणासाठी बसलेले मराठा योद्धा नवनाथ काळे यांची तब्येत खालावलेली आहे त्यासाठी त्यांना मराठा क्रांती मोर्चा आणि पोलीस प्रशासन यांनी वैद्यकीय उपचारासाठी येथील ॲपेक्स हॉस्पिटल मध्ये आयसीयूत ऍडमिट केले आहे. मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन उपोषण असे चालूच राहणार असल्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला आहे.