देऊळगाव राजे : पुढारी वृत्तसेवा : आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) सायंकाळी चार वाजता नियोजित होता. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
कारखान्याचा मोळीपूजनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. अजित पवार यांच्या हस्ते मोळीपूजनाचा कार्यक्रम झाला असता तर हंगामातील उच्चाकी बाजारभावाची अपेक्षा उस उत्पादकाना होती. दरम्यान मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या दौऱ्याला सकल मराठा समाजाकडून विरोध करण्यात आला होता, त्यामुळे हा मोळीपुजनांचा कार्यक्रम होईल का नाही याची उत्सुकता तालुक्यासह राज्यातील जनतेला लागून राहिली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकृती अस्वस्थता यामुळे की मराठा समाजाच्या विरोधामुळे गैरहजर राहणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.
हेही वाचा :