Pune News : ‘निरा-भीमा’चे 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट | पुढारी

Pune News : ‘निरा-भीमा’चे 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

बावडा : पुढारी वृत्तसेवा :  निरा-भीमा सहकारी साखर कारखाना शेतकर्‍यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्यास बांधील आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल. शेतकर्‍यांनी आपला सर्व ऊस निरा-भीमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी मंगळवारी (दि. 31) केले.

शहाजीनगर येथील निरा-भीमा कारखान्याच्या चालू सन 2023-24 च्या 23 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या 46 ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते साधेपणाने; परंतु उत्साही वातावरणामध्ये करण्यात आला. लालासाहेब पवार पुढे म्हणाले की, चालू गळीत हंगामामध्ये गाळपास येणार्‍या उसाला पहिली उचल 2500 रुपयांप्रमाणे देण्यात येईल. त्यानंतरचे ऊसबिलाचे हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे देण्यात येतील. या प्रसंगी गव्हाणपूजन संचालक दादासाहेब घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, अ‍ॅड. कृष्णाजी यादव, सुधीर पाटील, प्रतापराव पाटील, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, सुरेश मेहेर, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, अमरदीप काळकुटे, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, तानाजी नाईक, मोहन गुळवे, कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button