Pipmri : शाळांसमोर टवाळखोरांचा वावर | पुढारी

Pipmri : शाळांसमोर टवाळखोरांचा वावर

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी येथील खासगी शाळांसमोर टवाळखोर तरुणांचा वावर वाढल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांकडून याबाबत कारवाई सुरु करण्यात आली आहे. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत गाडीवर येऊन जोरात हॉर्न वाजवणे, मुलींना पाहुन कमेंट करणे, गाडीवर ट्रीपल सीट फिरणे असे प्रकार टवाळखोर तरुणांकडून सुरु होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या विभाग अध्यक्ष (चिंचवड) वैशाली बोत्रे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन दिले होते.

उपशहर अध्यक्षा अनिता पांचाळ, उपविभाग अध्यक्ष विशाल साळुंके, शाखा अध्यक्ष हेमा ननावरे, राधा साळुंके आदी या प्रसंगी उपस्थित होते. शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत शाळेच्या बाहेर गटाने थांबण्यास पोलिसांकडून प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, टवाळखोर तरुणांना समज दिली जात आहे. त्याशिवाय, शाळेतील सुचना पेटी तपासली जात आहे.

हेही वाचा

Back to top button