

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल हमास युद्धाचा आज २४ वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले होत आहेत. या युद्धात आतापर्यंत ९,५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत गाझामध्ये ८ हजारांहून अधिक नागरिकांचा तर 1400 हून अधिक इस्रायली नागरिकांचा बळी या संघर्षाने घेतला आहे. दरम्यान, गाझामध्ये इस्रायली सैनिकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने हे युद्ध आणखी चिघळणार असे संकेत मिळत आहे. युद्धात विजय आणि हमासचा खात्मा या दोन बाबींवर आम्ही सर्व लक्ष केंद्रीत केले आहे, असे इस्त्रायलचे संरक्षण प्रमुख हर्झी हालेवी यांनी स्पष्ट केले आहे. (Israel-Hamas War)
इस्त्रायल संरक्षण दलाने आज (30 ऑक्टोबर) माहिती दिली की, "सीरियातील सीरियन भागात लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला केला. सीरियाने केलेल्या हल्ल्याचा हा बदला आहे. हे युद्ध आणखी बरेच दिवस सुरू राहू शकते, ज्यासाठी इस्रायल पूर्णपणे तयार आहे. दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी युद्धाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे जाहीर केले आहे. सध्या आम्ही विजय आणि हमासचा खात्मा या दोन बाबींवर सर्व लक्ष केंद्रीत केले आहे, असे इस्त्रायलचे संरक्षण प्रमुख हर्झी हालेवी यांनी स्पष्ट केले आहे. (Israel-Hamas War)
इस्रायली सैनिकांनी केलेल्या हल्ल्यामुळे हमासचे कंबरडे मोडले आहे. दहशतवादी संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने युद्ध लढण्यासाठी इतर देशांना मदतीचे आवाहन केले आहे. इजिप्त शक्य तितक्या लवकर गाझाला मदत पुरवण्यासह निर्णायक भूमिका घेईल, असे हमास पॉलिटब्यूरोचे सदस्य मौसा अबू मारझोक यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
रविवारी खाद्यपदार्थांनी भरलेले तीन डझन ट्रक गाझामध्ये दाखल झाले. मात्र, गाझामध्ये अडकलेल्या लोकांसाठी ही मदत सामग्री फारच कमी आहे. इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामधील हजारो लोक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना उपचाराची नितांत गरज आहे. वीज, पाणी, इंधन, औषध आणि अन्नपदार्थ यांच्याशी झुंजत असलेले गाझातील लोक जगाकडे मदतीची याचना करत आहेत. गाझाचे दुसरे सर्वात मोठे शहर खान युनिस येथेही परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक दिवसांपासून अन्नपदार्थ व पाण्याचा तुटवडा असून, सर्वत्र राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहांबाहेर लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.
युद्धामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याबद्दल अमेरिकेने रविवारी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी रविवारी सांगितले की, गाझामधील लष्करी कारवाईत इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिक आणि हमासचे दहशतवादी यांच्यात फरक केला पाहिजे, असे अमेरिकेचे मत आहे. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील निष्पाप लोकांविरुद्ध हिंसाचार थांबवावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान नेतन्याहू यांना केली. दरम्यान,रविवारी (दि.२९ ऑक्टोबर) पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा हे युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :