घरच्या मैदानात नामुष्की ! बारामतीच्या वडगावात अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे | पुढारी

घरच्या मैदानात नामुष्की ! बारामतीच्या वडगावात अजित पवारांच्या पोस्टरला फासले काळे

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या काही तरुणांनी उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
बारामती- निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यानी त्यास काळे फासले. दरम्यान घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिस दाखल झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बारामती तालुक्यात आता परिस्थिती अधिकच संवेदनशील बनत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमत्री अजित पवार यांना माळेगावचा दौरा रद्द करावा लागला होता. आता परिस्थिती अधिकच हाताबाहेर जावू लागली आहे.

हेही वाचा : 

Back to top button