![Bhima River News : भीमानदीपात्रात आढळले दोन पुरुषांचे मृतदेह](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2Fbhima-river.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नानगाव( ता.दौंंड ); पुढारी वृत्तसेवा : पारगाव सा.मा. व नागरगाव ( ता. शिरूर ) यामधून वाहणाऱ्या भीमानदीपात्रात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदीपात्र मृतदेह असल्याचे पोलिसांना समजताच शिरुर तालुक्यातील पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पहाणी केली, तसेच हे दोन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.
नदीपात्रात दोन मृतदेह असल्याचे समजतात पारगाव व नागरगाव येथील नागरिकांनी नदीपात्रात मृतदेह पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती. कारण मागील काळात याच नदीपात्रात आठ जणांचे मृतदेह आढळून आले होते. पारगाव – नागरगाव या दोन गावांना व दोन तालुक्याला जोडणारा भीमानदीवर पुल आहे. सध्या या पुलाखाली पाणी खुपच कमी असून नदीपात्र कोरडे पडू लागले आहे. त्यामुळे नक्की हा प्रकार कसा व कशामुळे घडला असेल याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा