Pune News : ऐकावे ते नवलच! मॉडर्न राहत नाही म्हणून पत्नीचा छळ

Crime
Crime

पुणे : पत्नी मॉडर्न राहत नाही, रंगाने काळी आहे, कुरूप आहे, असे म्हणून मानसिक आणि शारीरिक छळ करणार्‍या पतीला न्यायालयाने दणका दिला. पत्नीला मासिक 8 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत.) यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात किरकोळ गोष्टींवरून वाद सुरू झाले. पत्नी मॉडर्न राहत नाही, म्हणून पतीने पत्नीला त्रास देणे सुरू केले. तरीही काही दिवस पत्नी हे सगळे सहन करीत पतीसोबत राहत होती.

मात्र, पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक छळ करू लागला. त्यामुळे पत्नीने अ‍ॅड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. तसेच उदरनिर्वाहासाठी कोणतेच साधन नसल्याने पोटगी मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आला होता. पती चांगल्या कंपनीत नोकरी करतो. त्याच्याकडे उत्पन्नाचा स्रोत आहे. तसेच त्याच्यावर घरातील कोणीही अवलंबून नाही. मात्र, माझ्याकडे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने मासिक 20 हजार रुपये पोटगी मिळावी, असा दावा पत्नीने केला होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news